दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूसमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

कुडूसमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

BHATKE KUTREप्रतिनिधी
कुडूस, दि. 9 : कुडूसमधील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने शालेय विद्यार्थ्यांना व मॉर्निंग वॉक करणार्‍यांना फिरणेही धोक्याचे झाले आहे.
कुडूसमधील शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची व बाहेर गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असून, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍यांची संख्याही मोठी आहे. मात्र भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढत असल्याने लवकर घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. याबाबत नागरिकात हे कुत्रे मुंबई, ठाण्यातून पकडून पिंजरा गाडीतून कुडूस परिसरात सोडले जातात. अशी चर्चा आहे. आजवर अनेक मुलांना व काही मोठ्या माणसांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अधिक लक्ष घालून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top