दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : के. डी. हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न!

बोईसर : के. डी. हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न!

KD HIGHSCHOOLवार्ताहर
बोईसर, दि. 11 : चिंचणीच्या के. डी. हायस्कूलच्या 1984-85 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे आणि परिसरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या स्नेहबंध परिवाराचे स्नेह संमेलन चिंचणी-पाटीलवाडा येथील उमंग नारळी बाग रिसॉर्ट येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सुरुवात झाली. कार्यक्रमातून वर्षभरात दिवंगत झालेले शिक्षक, मित्रांच्या मृतात्म्यांस श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांचा परिचय, मनोगत व जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. मनोरंजन कार्यक्रम, खेळ, गप्पा-गोष्टी यांसारख्या विविधरंगी कार्यक्रमातून हे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे समापन वंदेमातरम्नी करण्यात आले. सूत्रसंचालन नगिन बारी यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी स्नेहबंध परिवाराचे नयना कोरे, सुप्रिया सावे, छाया धानमेहेर, गिता लाडे, लतिका व्यास, भूपेंद्र सावे, विलास पाटील, प्रशांतकुमार सावे, रविन्द्र राऊळ, उमेश चव्हाण, भूपेन्द्र चुरी, किशोर तांडेल, सुरेश जैन, अशरफ शेख, मनोज वझे, मनोज चुरी, विजय चुरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

comments

About Rajtantra

Scroll To Top