दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सालवड ग्रामपंचयतीवर शिवसेनेचा भगवा

सालवड ग्रामपंचयतीवर शिवसेनेचा भगवा

LOGO 4 Onlineवार्ताहर
बोईसर, दि. 9 : पालघर तालुक्यातील सर्वात मोठी व तारापूर एमआयडीसी असलेल्या सालवड ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कारखाने असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असते. नुकत्याच झालेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेच्या विदुला विदुर पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर उपसरपंचपदी मनोज अनंत ठाकूर यांची बिनविरोध निवड झाल्याने सालवड ग्रामपंचयतीवर शिवसेनेचा भगवा कायम राहिला आहे.
सालवड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व 17 सदस्यांसह एकूण 18 सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत आहे . या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात तारापूर एमआयडीसी अंतर्गत शेकडो औद्योगिक कारखाने असल्याने ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सधन मानली जाते. कररुपाने मोठ्याप्रमाणावर निधी जमा होत असल्याने त्यामाध्यमातून विकास कामे करण्याकरिता सरपंच व उपसरपंच पदासाठी नेहमीच मोठी रस्सीखेच असते. मात्र या निवडणुकीत सरपंचपद हे थेट जनतेमधून निवडले जाणार असल्याने येथील मतदारांनी माजी पंचायत समिती सभापती विदुला पाटील यांना बहुमताने निवडून दिले. तर त्यानंतर झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत साई सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांना सर्व सदस्यांनी सशर्त पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विदुर पाटील, पंचायत समिती सदस्य विपुल पाटील, संध्या खुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य वैदेही वाढाण, पास्थळच्या सरपंच मंजुळा गोवारी यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top