दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : ट्रकखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू एक जखमी

वाडा : ट्रकखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू एक जखमी

WADA ACCIDENT2प्रतिनिधी
वाडा, दि. 09 : दोन मोटारसायकलींची धडक होऊन रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या दोघांचा पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 1 जण जखमी झाला आहे.
तालुक्यातील खानिवली येथील पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून प्रभाकर त्रिंबक गोवारी (वय 35, रा. आवंढा) व संतोष चंद्रकांत पडवले (वय 31, रा. घोडमाळ) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. तर सुभाष महादू दाभाडे हा जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही एम.एच.48/ए.एस. 5043 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कोणसईहुन आवंढ्याच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या मोटरसायकलला त्यांच्या गाडीची धडक बसली. या धडकेनंतर नियंत्रण सुटल्याने प्रभाकर गोवारी व संतोष पडवले हे रस्त्याच्या मध्यभागी पडले. दुदैवाने याचवेळी मागून भरधाव वेगात येणारा काँक्रीट मिक्सरचा ट्रक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर सुभाष दाभाडे हा जखमी झाला आहे.
दरम्यान, ट्रकचालकास तात्काळ अटक करण्यात आली असुन वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top