दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नागसेवकांचा सत्कार!

वाडा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नागसेवकांचा सत्कार!

WADA PRAVASI SANGHATNAप्रतिनिधी
वाडा, दि. 09 : वाडा नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या असून या निवडणुकीत वाडा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या उपाध्यक्ष वर्षा गोळे, सदस्य रामचंद्र जाधव हे निवडून आले आहेत. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर संघटनेचे सचिव प्रा. किरण थोरात यांना राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान संघटनेचे संस्थापक विशाल मुकणे व अनंता सुर्वे यांनी पत्रकार संजय लांडगे यांची कार्यकारी सदस्यपदी नेमणूक केली आहे. तर यावेळी संघटनेच्या आजवरच्या प्रवासी हिताचा आढावा आणि भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा करून विविध निर्णय घेण्यात आले. अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व प्रवासी मित्र उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top