दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगडमध्ये धान्य खरेदी योजना सुरु

विक्रमगडमध्ये धान्य खरेदी योजना सुरु

LOGO 4 Onlineप्रतिनिधी
विक्रमगड, दि. ८ : आदिवासी विकास विभागामार्फत विक्रमगड तालुक्यात धान्य खरेदी योजना सुरु करण्यात आली असून भात उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य भात खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणावे असे आवाहन जव्हारचे उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री. चौधरी यांनी केले आहे.
भात खरेदी केंद्रांवर महामंडळाने १ प्रतीच्या भातासाठी १ हजार ५९० तर मसुरा अथवा सुवर्णा या जातीच्या धान्यास १ हजार ५५० दर जाहीर करण्यात आला आहे. या भात खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यावर ऑनलाईन पध्दतीने जमा होणार करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक चौधरी यांनी दिली. विक्रमगडमधील सहकारी राईस मिल येथे हे भातखरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून शेतकऱ्यांनी आपले धान्य ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे मुख्य प्रवर्तक घन:श्याम आळशी यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top