दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मेमू रेल्वेने उमरोळीचा थांबा चुकविला

मेमू रेल्वेने उमरोळीचा थांबा चुकविला

Memuप्रतिनिधी
पालघर, दि. ८ : डहाणू रोड कडून पनवेल येथे जाणाऱ्या ६९१६४ मेमू गाडीने आज उमरोळी येथे रेल्वे स्थानकाचा थांबा चुकविल्याने गोंधळ झाला. यामुळे पनवेल कडे जाणाऱ्या ६० – ७० प्रवाशांचे हाल झाले.
डहाणू रोडहुन पनवेल कडे जाणारी मेमू आज सकाळी ५. ५७ वाजता उमरोळी येथील आपला नियोजित थांबा न घेताच पुढे गेली. गाडीतील प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर गाडी मध्ये चेन पुल्लिंग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न झाला. ही मेमू गाडी पुढे लांब वर जाऊन थांबल्यानंतर काही प्रवाशांनी धावत जाऊन गाडी पकडली, मात्र अधिकतर प्रवाशांची गाडी सुटली.
उमरोळी येथे स्टेशन मास्टर कार्यालय नसून या स्थानकासाठी पालघर किंवा बोईसर रेल्वे स्टेशनमधून नियंत्रण नाही. त्यामुळे लोकल व मेमू चालकांना दिलेल्या सूचने प्रमाणे गाड्या या स्थानकांमध्ये थांबत असतात. मुंबई प्रमाणे डहाणू रोड पर्यंत पश्चिम रेल्वे वर ऑटो सिंगनल प्रणाली कार्यान्वित असल्याने उपनगरीय गाड्यांसाठी लाल सिग्नल देण्याची पद्धत नाही. त्यामुळे मेमू चालकाने गाडी का थांबवली नाही हे चौकशी अंती समजू शकेल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेमू गाडी ने उमरोळी थांबा चुकविल्याणानंतर खोळंबलेल्या प्रवाशांनी मागून येणारी अंधेरी लोकल चेन पुलिंग करून काही काळ रोखून ठेवली, तसेच उमरोळी येथील प्रवासी आणि नागरिकांनी नंतर पालघर येथे येऊन तक्रार दाखल केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top