दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » जव्हारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा गुजराती समाजा कडून सत्कार

जव्हारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा गुजराती समाजा कडून सत्कार

Jawar news 3प्रतिनिधी
जव्हार: जव्हार येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांचा जव्हारच्या हिंदू गुजराती समाजाकडून एका विशेष कार्यक्रमातून सिंफनी गार्डन येथे सत्कार करण्यात आला.
गुजराती समाजाच्या वतीने माजी अध्यक्ष हर्षदसर मेघपुरीया, अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सचिव परेश पटेल व अनेक कार्यकर्ते यांनी अतिशय भव्य प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुजराती समाजाचे अश्या प्रकारचे स्वागत व सत्कार करणे हे एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण असल्याचे जव्हारच्या सर्व नागरिकांकडुन सांगण्यात येत आहे.
कार्यक्रमासाठी नंदुरबार,भिवंडी,मोखाडा येथुन पाहुणे निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रत्येक नगरसेवकांनी आपले सत्कार स्वीकारीत मनोगत व्यक्त करीत व आपले निवडणुकीचे अनुभव सांगितले
या कार्यक्रमात वेगवेगल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पायल मेघपुरीया व निलेश रावळ यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top