दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » आजच्या युवतींनी गुन्हेगारी प्रवृतीला धडा शिकवावा! -रविंद्र नाईक

आजच्या युवतींनी गुन्हेगारी प्रवृतीला धडा शिकवावा! -रविंद्र नाईक

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी :
कुडूस, दि. 07 : आजच्या युवतींनी गुन्हेगारी प्रवृत्ती दिसताच अशा गुन्हेगारी प्रवृतीला वेळीच धडा शिकवला पाहिजे व हे काम आजच्या मुली सहज करू शकतात, असे आवाहन वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रविंद्र नाईक यांनी ह. वि. पाटील विद्यालयात मुलींना समुदेशन करताना केले.
या कार्यक्रमातुन पुढे बोलताना ते म्हणाले, मुलींना अनेक प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. याची काही उदाहरणे दिली व स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर बोलण्यापेक्षा वेळीच अशा राक्षसी प्रवृतीला ठेचले पाहिजे. प्रतिकार सहन करून उगाळीत बसण्यापेक्षा वेळीच त्याचा प्रतिकार करणे हेच घडलेल्या प्रवृतीला उत्तर आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेश पाटील व दक्षता समितीच्या महिला उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top