दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोकाशीपाडा येथे जलव्यवस्थापन योजना लोकार्पण सोहळा संपन्न! गावाची पाणीटंचाई समस्या सुटली

मोकाशीपाडा येथे जलव्यवस्थापन योजना लोकार्पण सोहळा संपन्न! गावाची पाणीटंचाई समस्या सुटली

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी
जव्हार, दि. 07 : तालुक्यातील मोकाशीपाडा येथे ऑस्ट्रेलियन दांम्पत्याकडून दानरूपात मिळालेल्या निधीतून पुर्नत्वास आलेल्या नळपाणी योजनेचा लोकार्पण सोहळा सदर दांम्पत्याच्या हस्ते आज, रविवारी संपन्न झाला. या योजनेमुळे मोकाशी पाड्यातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण अखेर संपली आहे.
मुळचे भारतीय मात्र ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मुरलीधर कुमार व वंदना कुमार या दांम्पत्याकडून त्यांच्या आई-वडिलांच्या प्रित्यर्थ नळपाणी पुरवठा पेयजल योजनेसाठी दानस्वरूपात 8 लाख 50 हजारांचा निधी देण्यात आला होता. या निधीतून मोकाशीपाड्यात 9 स्टँड पोस्ट बसविण्यात आले आहेत. तर 11 हजार लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या योजनेमुळे येथील 64 कुटुंबांची पाण्याची समस्या सुटली आहे. जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाड्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात व्हायची, तसेच एप्रिल, मे महिन्यात तर येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असे. ही समस्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या दानशूर दांम्पत्याकडून मोकाशीपाड्यात नळपाणी पुरवठा योजना तयार करून देण्यात आली असून, त्यामुळे येथील घराघरात आता नळाचे पाणी यायला सुरवात झाली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे भीषण पाणी टंचाईचा सामना करणार्‍या मोकाशीड्यातील नागरिकांनी या दांम्पत्याचे आभार मानले आहेत. नळपाणी योजनेमुळे येथील आदिवासी महिलांनी आनंद व्यक्त करत तारपा नृत्य करून या दांपत्याचे स्वागत केले.

दानसुर कुटुंबाकडून मुबलक पाणी मिळाले आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आणि आमच्या महिलांना मोठा आनंद मिळाला आहे. यावेळी महिलांमध्ये मोठे आनंदाचे उत्सवाचे वातावरण दिसत होते. त्या ऑस्ट्रेलियाच्या कुटुंबाचे महिलांनी आपल्या आदिवासी महिलांनी तारपानाच करून स्वागत केले.
जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाड्यातील जलव्यवस्थापण व लोकार्पण सोहळ्यासाठी ऑस्ट्रेलियाचे दानसुर दांम्पत्य व पाणी योजनेचे उदघाटक मुरलीधर कुमार, वंदना कुमार (ऑस्ट्रेलिया), कार्यक्रमाचे व आदिवासी आघाडी अध्यक्ष- हरीचंद्र भोये, प्रमुख पाहुणे श्रीधर कोचरेकर, जि. प.सदस्य सुरेखा थेतले, समाजसेवक प्रकाश चौधरी, पाणी पुरवठा योजनेचे इंजिनीअर ,प्रभाकर मिसाळ , सरपंच सुशीला घाटाळ, शरद शेळके, पो.पाटील मधू जंगली, उपसरपंच- रवींद्र ओळंबा योगेश भोये, तसेच ग्रामस्थ, महिला वर्ग, असे मान्यवर या जलव्यवस्थापण व लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते.

आमच्या गावात खूप वर्षांपासून पाणी टंचाई होती आणि महिला पाण्यासाठी 500मीटर अंतरावरून डोक्यावर पाणी वाहत होत्या परंतु या योजनेमुळे आत्ता महिलांना घराजवळ पाणी मिळणार आणि आम्ही ही योजना पुढे चांगली टिकवुन ठेवू आणि सर्वाना वेळेत पाणी मिळेल असं मत व्यक्त केले .  —-   रवींद्र ओळंबा पाणी व्यवस्थापन समिती सचिव

comments

About Rajtantra

Scroll To Top