दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » समाज परिवर्तनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास साधावा! – प्रा. बाळासाहेब बिडवे

समाज परिवर्तनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास साधावा! – प्रा. बाळासाहेब बिडवे

RASEYO VIDYAPITH NSSपालघर, दि. 06 : समाज परिवर्तनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्वत:चा विकास साधावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठ रासेयो समन्वयक प्रा. बाळासाहेब बिडवे यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष निवासी शिबिर बहाडोली गावात संपन्न झाले. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ग्राम स्वच्छता, ग्राम प्रबोधन, शोषखड्डे निर्मिती, परसबाग निर्मिती, वृक्षारोपण इत्यादी कामे रासेयो स्वयंसेवकांनी शिबिरा दरम्यान केली. पत्रकार पंकज राऊत यांनी विविध व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा तर पत्रकार नीरज राऊत यांनी पालघर तालुका नवनिर्मितीच्या काळात रोजगाराची संधी या विषयांवर व्याख्यान दिले. प्रा. जगदिश संसारे यांनी विद्यार्थ्यांना पथनाट्याचे प्रशिक्षण दिले व प्रबोधनसाठी पथनाट्याची आवश्यकता विशद केली. डॉ. सखाराम डाखोरे यांनी जगणे सुंदर करणार्‍या कविता सादर केल्या. तसेच आपल्या जगण्यातील खडतर अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्रभाई शहा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणबाह्य उपक्रमात आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन केले. सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी नोकरी व्यवसायविषयक मार्गदर्शन केले. संस्था कार्यकारीणी सदस्य सुरेश जोशी आणि सांस्कृतिक कार्याध्यक्ष सुधीर दांडेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. किरण सावे व पर्यवेक्षक प्राप्त. महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक व्याख्यान दिले. बहाडोली गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे शिबिराला सहकार्य लाभले. दरम्यान, जिज्ञा मोरे, वैभव मांडवे, सुबोध जाधव यांना उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top