दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जन उत्कर्ष प्रबोधिनीतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

जन उत्कर्ष प्रबोधिनीतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpgडहाणू दि. 7 : जन उत्कर्ष प्रबोधिनीतर्फे कळमदेवी 1 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान जाधव-भंडारी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन डहाणूतील करंदीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र घागस यांनी केले असून आतापर्यंत शंकर सावंत (शिव चरित्र), बी. जे. प्रधान (यशस्वी कसे व्हाल), मोहिते सर (संस्काराने घडतो माणूस), पी. आर. तायडे (नका गळफास लावू), सिस्टर ज्युलीएट डीआब्रीओ (आजचा नव युवक), डॉ. प्रवीण राठोड (ग्रामीण भागातील आरोग्य समस्या) यांनी पुष्पे गुंफली आहेत. व्याख्यानमालेतील पुढील पुष्पे डॉ. प्रदीप पवार (आरोग्य संपदा), एस. व्ही. होन (मोबाईल- शाप की, वरदान?), संजीव जोशी (भारतीय राज्यघटना), कैलास बर्वे (समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी) गुंफणार आहेत. 12 जानेवारी रोजी संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कैलास जाधव भूषविणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून श्रीमती स्नेहल राजपूत उपस्थित राहणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top