दिनांक 21 January 2018 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवाचे पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवाचे पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते उद्घाटन

GRAM MOHOTSTAVपालघर, दि. 06 : विज्ञान प्रदर्शने व ग्रंथमहोत्सव हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगातील विद्यार्थीशी स्पर्धा करण्यासाठी उपयोगी पडत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी केले.
43 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सावाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते बोईसर एज्यूकेशन सोसायटीचे डॉ. स. दा. वर्तक विद्यालय बोईसर येथे उद्घाटन झाले. त्यावेळी सवरा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, साहित्यिक विशाल तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, बोईसर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकूमार वर्तक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सवरा म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव या विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सावामूळे मिळत असतो. चांगले ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचन केले पाहिजेत. पुस्तकातील हे ज्ञान कायमचे असते. ग्रंथ वाचनामूळे ज्ञानाचा साठा होत असतो. वाचना शिवाय जगामध्ये ज्ञान मिळत नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सावाची आवश्यकता आहे. यावेळी मिलिंद बोरीकर म्हणाले की, या विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवामूळे विद्यार्थ्याना जगातील व्यवहारीक ज्ञानाचा उपयोग होईल.
प्रारंभी ग्रंथ दिंडी व विज्ञान दिंडी काढण्यात आली होती. तसेच पालकमंत्री सवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

comments

About Rajtantra

Scroll To Top