दिनांक 21 October 2018 वेळ 1:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूमध्ये आरएसएस तर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रम संपन्न

डहाणूमध्ये आरएसएस तर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रम संपन्न

डहाणू, RSS1दि. 07 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात 263 जागांवर एकाचवेळी हिंदू चेतना संगम हा कार्यक्रम होत असून डहाणू येथेही कार्यक्रम संपन्न झाला. मिहीर शहा यांच्या मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून डहाणूतील प्रसिद्ध उद्योजक रविंद्र राऊत, तर वक्ता म्हणून अखिल भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमात पूर्ण गणवेशात उपस्थित असलेले स्वयंसेवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. स्वयंसेवकांनी हिंदू चेतना संगमचे लयबद्ध स्वरात गीत गायन केले.
समाजामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचे आकर्षण वाढत असल्याचे निष्पन्न होत असून यामुळेच कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील स्त्री-पुरुष नागरिक सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थितांना संघ कार्याचा परिचय करुन देण्यात आला. सर्वच समाजबांधवांना आवाहन करण्यात आले की, संघ हा अनुभूतीचा विषय असून संघ समजून घेण्यासाठी लोकांनी संघात आले पाहिजे. नागरिकांना संघप्रेरणेतून चालणार्‍या विविध कार्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने होताना दिसला.

comments

About Rajtantra

Scroll To Top