दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करावे! पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करावे! पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

वार्ताRESING DAYहर
बोईसर, दि. 05 :
पोलीस दलामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत याची जाणीव ठेवून नागरिकांनी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त बोईसर येथे नागरी सुरक्षा जागृती अभियान, महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात सवरा बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, डहाणूचे नगराध्यक्ष भरत रजपूत, जिल्हा पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील महिला दक्षता समितीच्या सदस्या, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना सवरा म्हाणाले की, पोलीस व जनता यांचा समन्वय असला पाहिजे त्यामूळे गुन्हेगारी प्रमाण कमी होण्यास मदत होते. पोलीस दलाच्या कामगिरी मुळे जिल्ह्यात मुले हरवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात महिला दक्षता समितीचे काम चांगले आहे व महिलांचा सार्वजनिक क्षेत्रात सहभाग वाढत आहे हि चांगली बाब आहे. पालघर जिल्हा पोलीस दल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी सदैव प्रर्यत्न करीत आहे. आजचा हा मेळावा पोलीस दलाच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे, असे सवरा म्हणाले. पालघर पोलीस दलातर्फे राबविण्यात येणार्‍या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रमाचेही सवरांनी यावेळी कौतूक केले.
पोलीस अधीक्षक सिंगे यांनी संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही प्रणालीद्वारे जोडण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. या प्रणालीत जिल्ह्यातील प्रवेशाच्या ठिकाणी, तसेच शहरातील सार्वजनिक व महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. याकामी ओएफसी केबल टाकण्याचे काम सुरू असून कॅमेरे बसविण्याकामी उद्योगातील सीएसआर फंडाची मदत तसेच लोकसहभाग अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये योगेश चव्हाण यांनी रेझिंग डेचे महत्व सांगतानाच पोलिस विभागाची महिला दक्षता समिती आणि पोलीस पाटील यांचे तपासात मिळणारे सहकार्य तसेच पोलीस विभागासमोर असलेली आव्हान या संदर्भात विवेचन केले. तोच धागा पकडून सिंगे यांनी गेल्या वर्षभरातील महिलांवर घडलेले गुन्हे, खून तसेच खूनाचा प्रयत्न आदी गुन्ह्यामंध्ये आरोपींना अटक करण्यात पोलीसांनी केलेल्या उत्तम कामगिरीची माहिती दिली. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी व घडलेले गुन्हे उघडकीस येण्यासाठी अनेक पोलीस स्टेशनना अतिरिक्त बळ पुरविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांत अमली पदार्थांचा मोठा साठा पडकण्यात आला, तसेच विरार-वसई भागातील गेल्या 20 वर्षांपासून हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला यश आल्याचे देखील ते म्हणाले. पालघर पोलिसांनी गेल्या वर्षभरात अनेक तांत्रिक सुधारणा घडवून आणल्याने तपासाच्या गतीत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचेही सिंगे म्हणाले. जिल्ह्यातील 22 लाख जनसंख्येसमोर 2800 पोलिसांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top