दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक संपन्न

जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक संपन्न

JILHA AAROGYA SEVA SAMITIपालघर, दि. 5 : पालघर जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयील नियोजन भवनात संपन्न झाली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, आरोग्य सेवा विभाग मुंबईच्या सहाय्यक संचलिका (वैद्यकीय) डॉ. सुरेखा मेंढे, समितीच्या सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे व जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी सवरा म्हणाले की, जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी सुचवलेल्या सुचनांचा विचार शासन स्तरावर केला जाईल. पालघर जिल्हा कुपोषण मुक्तीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जनतेच्या आरोग्याच्या निगडीत असलेल्या कोणत्याही स्वरुपाच्या विषया संदर्भात समितीच्या सदस्यांनी समन्वयाची भूमिका पार पाडावी. जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य व्यक्तीला चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे हे आपले ध्येय असल्याचे सवरा यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कांचन वानेरे यांनी समितीच्या कार्याचे सादरी करण केले. यावेळी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवा संबंधीत विविध सुचना समितीच्या अध्यक्षांकडे केल्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top