दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन

जव्हार : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती या विषयावर मार्गदर्शन

JAWHAR NEWSप्रतिनिधी
जव्हार, दि. 05 : गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जव्हार यांच्या वतीने 3 ते 9 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार हिवाळी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील कोगदा चंद्रनगर या ठिकाणी हे शिबीर भरविण्यात आले आहे. या शिबिरात युवा पिढीला स्वयंसहायता समूह व रोजगार निर्मिती या विषयी माहिती करून देण्यासाठी प्रभाग समन्वयक मनोज कामडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वयंसहायता समूहाचा उगम, इतिहास दशसूत्री यासह जव्हार तालुक्यातील महिलांची सद्यःस्थिती व महिलांनी सुरू केलेल्या व्यवसाय याविषयी माहिती देण्यात आली.
सध्याची युवा पिढी शिक्षण घेऊन नोकरीसाठी पळत असल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात युवा सुशिक्षित बेकार होत आहे. त्यामुळे युवकांनी विविध व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन युवापिढीला करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 150 स्वयंसेवक सहभागी होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी राहुल पाटील, कांतिलाल पाटील, पूरसिंग राठोड, डॉ. अविनास आडसुळ उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top