दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : भारती विद्यापीठ आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

जव्हार : भारती विद्यापीठ आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

प्रतिनिधीJAWHAR BHARTI VIDYAPITH
जव्हार, दि. 05 : जव्हार येथील भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ आज, शुक्रवारी भारती विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमास जव्हारचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा गटनेते दिपक कांगणे व यतीन वाघमारे हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. जरग यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.कार्यक्रमास मराठी शाळेचे मुख्याध्यापक तखोर सर, भारती विद्यापीठ प्रशालाचे मुख्याध्यापक घाग सर, सहा. शिक्षक बल्लाळ सर, आव्हाड सर आदि शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह आदिवासी नृत्य प्रकार व क्रीडा खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. नगरसेवक कांगणे यांनी आपल्या मनोगतातून मी या शाळेचाच विद्यार्थी असुन शाळेतच आम्ही घडलो, प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्राची आवड असते, आपणही शाळेतील क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून यश प्राप्त करावे, असे मत व्यक्त केले. तर उपस्थित दोन्ही नगरसेवक हे आपल्या शाळेचेच विद्यार्थी असुन त्यांचा विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा, असे मुख्याध्यापक जरग यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top