दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » चंद्रकांत भोईर व प्रियांका मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चंद्रकांत भोईर व प्रियांका मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : AADRASH SHIKSHAK1AADRASH SHIKSHAK2
कुडूस, दि. 05 : वाडा तालुक्यातील चांबळे या शाळेतील शिक्षक चंद्रकांत भोईर व देवघर (गुंज) शाळेतील शिक्षिका प्रियांका मोरे यांना पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चंद्रकांत रामू भोईर यांनी शिक्षक म्हणून 22 वर्षे सेवा केली आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून विविध रोटरी क्लब व संस्थांच्या मदतीने शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम करून घेऊन शैक्षणिक कामात विशेष सहकार्य केले आहे. तसेच शालेय क्रिडा स्पर्धा व समूह गान स्पर्धांतुन मुलांना चांगले मार्गदर्शन करून विविध प्रकारच्या स्पर्धात शाळेचा लौकिक वाढविला आहे. त्यांनी प्रत्येक वर्षी 100 टक्के पटनोंदणीचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते देऊन भोईर यांना गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमातुन गुंज या अतिदुर्गम शाळेतील शिक्षिका प्रियांका मोरे यांना सवरा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मोरे यांनी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम राबविण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यांनी बाह्य व अंतर्गत सजावट करून शालेय वातावरण आकर्षक बनविले आहे. या उत्कृष्ट शैक्षणिक कामामुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या दोन्ही शिक्षकांचे तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top