दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विक्रमगड हायस्कूलचे वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न!

विक्रमगड हायस्कूलचे वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न!

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी :
विक्रमगड, दि. 05 : विक्रमगड हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी विक्रमगड हायस्कूल व कला वाणिज्य जुनियर कॉलेज विक्रमगड या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रम, नृत्य, नाटिका तसेच हँड पेंटिंग प्रदर्शन सादर केले. तसेच यावेळी कला, क्रीडा स्पर्धांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य पुंडलिक भानुशाली व प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जोशी सर व जोशी मॅडम, शालेय समिती अध्यक्ष फडके सर, विक्रमगड पंचायत समितीचे सभापती मधुकर खुताडे, पंचायत समिती सदस्य हिरा खांजोडे, पार्वती टोपले, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला काकड, महेश आळशी, मनोहर भानुशाली, मंगेश औसरकर, संतोष भानुशाली, संतोष भोई, मिलिंद भानुशाली, प्राचार्य सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जोशी सरांनी पुढील काळात प्रशालेसाठी नवीन इमारत व तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण मिळण्याबाबत आश्वासीत केले. तसेच मुलांमधील विविध कलागुणांबाबत मार्गदर्शन करतानाच विविध कला-स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसह हँड पेंटिंग प्रदर्शनाचे कौतुक केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top