दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आदिवासी बेरोजगारांना मिळाला जव्हार विकास प्रकल्पाकडून रोजगार

आदिवासी बेरोजगारांना मिळाला जव्हार विकास प्रकल्पाकडून रोजगार

पालघर, दि. 04 : शासनाWADAPAV STALL ANUDANच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणार्‍या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या जव्हार कार्यालयाद्वारे आदिवासी लाभार्थ्यांकरीता सन 2016 -17 मध्ये न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत वडापाव स्टॉलसाठी अनुदान मंजूर झाले होते. या उत्पन्नवाढीच्या योजनेसाठी जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड अशा चार तालुक्यातील 11 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. काल, बुधवारी या 11 आदिवासी लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने अनुदानाचा पहिला हप्ता प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते वर्ग करण्यात आला. सदर योजनेतून संबंधीत 11 लाभार्थ्यांना रोजगार निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये 3 दिव्यांग व 3 कातकरी लाभार्थ्यांचा सामावेश आहे. याप्रसंगी जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रशांत साळवे, निवास यादव, पाटील व कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी अर्थसहाय्य मिळाल्याने त्यांनी प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांचे आभार व्यक्त केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top