दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा नगर पंचायत : भाजप गटनेते पदी मनिष देहेरकर, तर शिवसेनेच्या गटनेते पदी संदीप गणोरे यांची निवड

वाडा नगर पंचायत : भाजप गटनेते पदी मनिष देहेरकर, तर शिवसेनेच्या गटनेते पदी संदीप गणोरे यांची निवड

cropped-LOGO-4-Online.jpgवाडा, दि. 4 : शिवसेना तालुका बैठकीत वाडा नगर पंचायतीच्या शिवसेना गटनेते पदी प्रभाग क्रमांक सातमधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक संदीप गणोरे यांची एकमताने निवड करण्यात आली असून भाजपच्या तालुका कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक दहामधून निवडून आलेले मनिष देहेरकर यांची निवड करण्यात आली आहे. वाडा नगर पंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षा व सहा नगरसेवक निवडून आले होते. तर निवडणूकीत प्रमुख विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सहा नगरसेवक, काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top