दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हास्तरीय प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत रा. ही. सावे विद्यालयाला जेतेपद

जिल्हास्तरीय प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत रा. ही. सावे विद्यालयाला जेतेपद

वार्ताहर LOGO 4 Online
बोईसर, दि. 04 : बोईसर एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. सदा वर्तक विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या प्रश्‍न मंजुषा स्पर्धेत तारापूरच्या रा. हि. सावे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जेतेपद मिळवले आहे.
प्राथमिक विभागामध्ये धनश्री वाटकर व देवश्री पांचाळ या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. तसेच उत्कर्ष विद्याविहारच्या सायली पाटील व पारस बोरसे यांनी द्वितीय तर सफाळ्याच्या राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या नम्रता पाटील व सानिया घरत या विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक विभागात राजगुरू ह. म. पंडित विद्यालयाच्या अमेय गावडे व सुमित चव्हाण यांनी प्रथम क्रमांक, तर रा. ही. सावे विद्यालयातील प्रणव किणी व श्रेया सुभाने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच विरारच्या उत्कर्ष विद्यालयाच्या प्रणव परब व अविष्कार हेगिष्टे यांनी तृतीय क्रमांक पटवला.
यावेळी पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही रा. ही. सावे शाळेच्या सिद्धांत सावे, आर्या सावे व प्रियल चुरी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना प्रणोती निलेश चुरी व दीपा अभिजित बोबडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असुन या यशानंतर रा. ही. सावे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top