दिनांक 21 October 2018 वेळ 1:14 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरेंना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार

पालघर, दि. 04 :JILHADHIKARI NEWS मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणार्‍यांसाठी देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार पालघरचे जिल्हाधिकारी व उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन 2015-16 या वर्षात या योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था, अधिकारी व पत्रकारांना महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असताना जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top