दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : स्वीकृत नगरसेवकासाठी सेनेकडून डॉ. विठ्ठल सदगीर यांचे नाव चर्चेत! 11 तारखेला होणार निवड

जव्हार : स्वीकृत नगरसेवकासाठी सेनेकडून डॉ. विठ्ठल सदगीर यांचे नाव चर्चेत! 11 तारखेला होणार निवड

JAWHAR NAGARPARISHAD SENAप्रतिनिधी
जव्हार, दि. 04 : जव्हार नगरपरिषद निवडणूकीत सेनेने सत्ता स्थापन केली असली तरी स्वीकृत नगरसेवकासाठी त्यांच्या कोट्यात केवळ एकच जागा येणार असल्याने आता स्वीकृत नगरसेवकासाठीही शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र या पदासाठी ग्रामीण भागाचा जनाधार असलेले व कट्टर शिवसैनिक अशी ओळख मिळविलेले जव्हार शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर विठ्ठल सदगीर यांच्या नावाची चर्चा असुन पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे येत्या 11 तारखेला यावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
17 सदस्य संख्या असलेल्या जव्हार नगरपरिषदेत दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येणार आहे. मात्र शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक निवडुन आल्याने या दोन्ही पक्षांच्या गटाला प्रत्येकी 1 असे स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. यात शिवसेनेतर्फे डॉ. सदगीर यांचे तर राष्ट्रवादीमधुन 3-4 जणांची नावे चर्चेत आहेत. सेनेकडून डॉ. सदगीर यांच्यासह अ‍ॅड. प्रसन्न भोईर यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र स्वीकृत नगरसेवकाची माळ सदगीर यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे हे पद नेमके कुणाला मिळणार, की एखादी वेगळीच खेळी खेळली जाणार अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी इछुक असणार्‍या सदगीर यांनी पक्षाहीतासाठी आपली उमेदवारी मागे घेत मनाचा मोठेपणा दाखवला होता. यावेळी पक्षश्रेष्ठीनींही त्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आता 11 तारखेला होणार्‍या निवडीत पक्ष विठ्ठल सदगीर व प्रसन्न भोईर यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात स्वीकृत सदस्याची माळ घालतो, हे स्पष्ट होणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top