दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » भूकंपाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पालघरमध्ये दाखल

भूकंपाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पालघरमध्ये दाखल

LOGO 4 Onlineपालघर, दि 04 : मागील काही दिवसांपासुन पालघर जिल्ह्यातील जव्हार व विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात भुकंपाचे धक्के जाणवत असुन या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच नागरीकांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारचे पाहणी पथक पालघरमध्ये दाखल झाले आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय हवामान खात्यातील (आय.एम.डी) भूकंप तज्ज्ञांचे हे पथक असून त्याला आय.आय.टी. मधील या विषयाचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. हे पथक पालघरमध्ये दोन दिवस राहणार असून भूकंपामुळे किती घरांना तडे गेले आहेत, किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करणार असुन स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर लवकरच पालघर परिसरात भूकंपाची मोजदाद करण्यासाठी सिसमोग्राफ हे यंत्र देखील बसविण्यात येणार आहे.
गेल्या 19 डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील शिरोशी, चौक, काशिवली व वळवंडा या चार गावांना भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर पालक मंत्री विष्णु सवरा यांनी जिल्हाधिकारी तसेच मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे या भागाची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी पाठपुरावा केला हाता. त्यानुसार हे पथक पालघरमध्ये दाखल झाले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top