दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अ. ज. म्हात्रे विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न

अ. ज. म्हात्रे विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न

MHATRE VIDYALAY SNEHSAMMELANडहाणू, दि. 4: स्नेहवर्धन मंडळ संचलीत नरपड येथील अ. ज. म्हात्रे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम विश्वस्त मंडळ व शालेय समितीचे अध्यक्ष तथा नरपडचे ऋषी तुल्य व्यक्तीमत्व अशोक नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून निवृत्त नायब तहसीलदार विश्वनाथ दामोदर पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, विश्वस्त दिनेश राऊत, शिवनाथ पाटील, सुरेंद्र पाटील, दिपक पाटील, कार्यवाह राजेंद्र पाटील, सरपंच संदेश रावते, मुख्याध्यापिका सौ. सुजाता राऊत हे उपस्थित होते. 3 जानेवारीच्या महाराष्ट्र बंदमुळे पश्चिम रेल्वे सेवा काही काळ बंद पडल्यामुळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वास्तुविशारद अभय विनायक म्हात्रे उपस्थित राहू शकले नाहीत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आणि सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंती निमित्त त्यांच्या तसबिरीला पुष्पहार घालून करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. सुजाता राऊत यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेच्या ज्ञानदीप हस्तलिखित अंकाचे प्रकाशन विशेष अतिथी यांच्या हस्ते झाले. शालेय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन 2016-17 च्या अहवालांचे वाचन करण्यात आले.
मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्यासह प्रत्येक इयत्तेत उत्तिर्ण झालेल्या, क्रिडा स्पर्धांमध्ये विविध क्रिडा प्रकारात विशेष नैपुण्य दाखविलेल्या विद्यार्थ्यांना आणि शालेय वैज्ञानिक प्रयोग सादर करून कौतुकास्पद कामगिरी करणार्‍या विद्यार्थी व शिक्षक यांना अनुक्रमे रोख पारितोषिक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन करमणुकीचे कार्यक्रम सादर केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top