दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » स्वतःच्या जमिनीकरिता सोहंग कुटुंब झिजवतय कोर्टाच्या पायर्‍या

स्वतःच्या जमिनीकरिता सोहंग कुटुंब झिजवतय कोर्टाच्या पायर्‍या

वार्ताहर cropped-LOGO-4-Online.jpg
बोईसर, दि. 03 : तारापूर औद्योगिक परिसरातील वारंगडे क्षेत्रात असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीच्या मालकाने येथील आदिवासी कुटूंबाच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी पालघर सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे स्वतःच्याच जमिनिकरिता या कुटूंबाला न्यायालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत.
वारंगडे येथील सर्वे नं. 63 वर असलेली 111 गुंठे जमिन माधव झिंनका सोहंग (धोंडी) या आदिवासी कुटूंबांच्या हिश्श्याची असुन हे कुटूंब या जमिनीवर भातशेती करत होते. मात्र या शेतीच्या बाजूला असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीने 2015 साली सोहंग कुटूंबीयांना विचारात न घेता या जागेवर भराव करून रस्ता तयार केला. विशेष म्हणजे याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जमिन मालक माधव सोहंग यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने शिवीगाळ केली होती. यानंतर सोहंग यांनी 2016 साली पालघर पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यानंतरही कंपनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने 29 जून 2016 रोजी साहंग यांनी पालघर सत्र न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने 5 जुलै 2016 रोजी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना याप्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही आतापर्यंत कंपनीच्या मालकावर अथवा कंपनीच्या व्यवस्थापकावर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट हे आदिवासी कुटुंब गेली तीन वर्ष पदरचे पैसे खर्च करून न्यायालयाच्या पायर्‍या झिजवत असून आपले वकील आर. बी. राऊत हे चांगल्या प्रकारे सहकार्य करत असुन लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा सोहंग कुटुंब बाळगून आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top