दिनांक 21 October 2018 वेळ 1:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

विलास मुकणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

VILAS MUKNEप्रतिनिधी
वाडा, दि. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धापड येथे कार्यरत असलेले शिक्षक विलास मुकणे यांना राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
शिक्षक म्हणून आपल्या सेवेच्या कालावधीत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी चांगले काम करणार्‍या शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाडा पंचायत समितीमार्फत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. नुकत्याच तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुकणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, महिला व बालकल्याण सभापती धनाश्री चौधरी आदी उपस्थित होते.
मुकणे हे गेली 24 वर्ष शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील कासघर व धापड या शाळांमध्ये त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले आहेत. प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या या कामाची दखल घेऊन पंचायत समितीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला आहे. मुकणेंना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top