दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » प्रवर्तक फाऊंडेशन मार्फत आयोजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सव संपन्न!

प्रवर्तक फाऊंडेशन मार्फत आयोजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सव संपन्न!

प्रतिनिधी SAVITRIBAI FULE JAYANTI-WADA
वाडा, दि. 03 : महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देणार्‍या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त वाड्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात प्रवर्तक फाऊंडेशनमार्फत आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेविका वर्षा गोळे यांनी भुषवले. याप्रसंगी वाडा सहपोलिस उपनिरीक्षक श्रीमती करडे, अ‍ॅड. विद्या ठाकरे, डॉ. माधुरी कांबळे, पोलिस पाटील नंदा बोरकर, उद्योजिका शिल्पा शिंदे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी नगरसेविका नयना चौधरी, जागृती कालन, आशालता भोसले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवर्तक फाऊंडेशनचे निहेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव, सागर थोरात, शुभम जाधव, आशिष बागूल, विनोद वाघचौरे, संतोष जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top