दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरी

जव्हार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरी

SAVITRIBAI FULE JAYANTI-JAWHARप्रतिनिधी
जव्हार, दि. 03 : तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान) हे ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटासोबत काम करीत असून यामुळे अनेक क्षेत्रांतून आज महिला पुढे येत असुन विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. हे सर्व काम उमेदच्या माध्यमातून सुरु आहे. यामध्ये जव्हार तालुक्यातील कृषी सखी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज कृषीसखीची आढावा सभा आयोजित केली होती. यावेळी सर्व महिलांनी एकत्र येवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरा केली. यावेळी उमेद अभियानातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती दिली व महिलांच्या आजच्या परिस्थिती विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागातील महिला आज मागे न राहता पुढे जात आहेत, हे चित्र उमेद अभिनानामुळे बदलत आहे, असे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. यावेळी तालुका व्यवस्थापक सतीश सोनावणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व आनंद जाधव यांनी श्रीफळ वाढून पूजा केली. यावेळी सर्व प्रभाग समन्वयक, समुदाय कृषी व्यवस्थापक तसेच बायफ मित्रचे गोरक्षनाथ भोर, शंभुराजे साळुंखे, इतर कमर्चारी व सर्व कृषीसखींसह महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत सूर्यवंशी यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top