दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

ROJGAR HAMI BHARTIप्रतिनिधी
विक्रमगड, दि. 03 : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात तांत्रिक सहाय्यकाच्या 10 व कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकार्‍यांच्या 10 अशा एकुण 20 जागांची कंत्राटी पद्धतीवर थेट तोंडी परीक्षेच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे. या जागांसाठी अनेक जिल्ह्यातून उमेदवार तोंडी परिक्षेसाठी 2 जानेवारी रोजी आले होते. यातील तांत्रिक सहाय्यक पदासाठी एकूण 183 अर्ज दाखल झाले असुन त्यात पालघर जिल्ह्यातील 95 उमेदवारांचा तर परजिल्ह्यातील 88 उमेदवारांचा समावेश आहे. तर कंत्राटी तांत्रिक कार्यक्रम सहाय्यक अधिकारी पदासाठी एकूण 107 अर्ज प्राप्त झाले असुन त्यात पालघर जिल्ह्यातील 29 उमेदवार तर परजिल्ह्यातील 78 उमेदवारांनी तोंडी परिक्षा दिली आहे. मात्र या जागांवर पालघर जिल्ह्यातील पात्र स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य अशोक भोये, पालघर जिल्हा आदिवासी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र जोगवला तसेच भाजपाचे विक्रमगड शहर उपाध्यक्ष मेहुल पटेल यांनी आपली वेगवेगळी निवेदने प्रशासनापुढे सादर केली.
दोन वर्षापुर्वी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लिपिक भरतीनमध्येही जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना डावलण्यात आले होते. तेथूनच भरतीप्रक्रीयांबाबत स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांमधे तिव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वर नमुद नोकरभरतीमध्येही स्थानिक उमेदवारांना डावलण्यात आल्यास जिल्ह्यात मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक उमेदवारांचा विचार करुन त्यांना यात प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top