दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मोखाड्यातील मनरेगावर शासकिय अनास्थेची संक्रांत यंत्रणा व ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष 111 कामे, 1608 मजूर यंदाची संक्रांत हलाखीत

मोखाड्यातील मनरेगावर शासकिय अनास्थेची संक्रांत यंत्रणा व ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष 111 कामे, 1608 मजूर यंदाची संक्रांत हलाखीत

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी
मोखाडा, दि. 03 : तालुक्यात मनरेगाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. शासकिय अहवालानुसार तालुक्यात केवळ 111 कामे सुरू असून 1608 मजूरांच्या हाताला कामे देण्यात आली आहे. त्यातच संक्रांतीपूर्वी एकाही हजेरी पत्रकाचा पगार होण्याची शाश्‍वती नसल्याने मजूरांची संक्रांत हलाखीची आणि कडवट होणार असल्याचेच चित्र आहे.
मोखाडा तालुक्यात रोहयो अंतर्गत 16 हजार 502 जॉबकार्डांची नोंदणी झालेली असून 1 हजार 445 कामे हातावर शिल्लक असून 8 लाख 10 हजार 144 मनूष्यदिन निर्मीती होईल, असे महसुल विभागाकडील रोहयो यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू मनरेगातील 50 टक्के कामे ही ग्रामपंचायतींनी काढायची आहेत. तथापी आज तारखे अखेर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींकडून केवळ 84 कामे काढण्यात आलेली असून फक्त 1098 मजूरांना कामे देण्यात आली आहेत. कामांचा अनूशेष भरून काढण्याची मुख्य जबाबदारी ग्रामपंचायतींची असतानाही ग्रामपातळीवर त्याबाबत कमालीची चालढकल केली जात आहे. तर यंत्रणांचीही तशीच परिस्थिती असून कृषी, वनविभाग, सामाजिक वनिकरण, सार्वजनिक बांधकाम या चार रोहयो यंत्रणांकडून फक्त 27 कामे काढण्यात आली असून केवळ 510 इतक्या अत्यल्प मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
एकीकडे शासन कुपोषण निर्मूलनासाठी सबळपणे प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र त्याची गळचेपी खुद्द तालुक्यातील रोहयो व्यवस्थेच्या अनास्थेपोटी होत आहे. कुपोषण निर्मूलनातील महत्वाचा दुवा म्हणजे भुक आहे. त्यादृष्टीने मातांना घरीच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नरनावरे यांनी केलेले आहे. तसेच 365 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असतानाही रोजगार निर्मितीबाबत एकूणच रोहयो यंत्रणांकडून कमालीची हेळसांड होत आहे. मात्र याबाबत नक्की कोणाला जाब विचारायचा या संभ्रमात मोखाड्यातील मजूरवर्ग दिसत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top