दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » किरण थोरात रक्तकर्ण पुरस्काराने सन्मानित

किरण थोरात रक्तकर्ण पुरस्काराने सन्मानित

KIRAN THORATवाडा दि. 1 : वाडा शहरातील बहुतांश सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व गेल्या 25 वर्षात 63 वेळा रक्तदान करणारे प्राध्यापक किरण थोरात यांना ठाण्यातील रक्तानंद ग्रूप महाराष्ट्र राज्य च्या वतीने 31 डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. एकीकडे आजची पिढी 31 डिसेंबरच्या रात्री इंग्रजी नववर्षाच्या आगमनासाठी मौज मजा, पार्ट्या व जल्लोष करीत असते तर ठाण्यातील रक्तानंद ग्रूपच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक भान म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करून तरुण पिढीला विधायक कार्यासाठी प्रोत्साहित करत असते.
प्राध्यापक किरण थोरात हे वाडा शहरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होत असतात. रुग्णमित्र, पोलीस मित्र, जनजागृती कार्यक्रम आदींच्या माध्यमातून ते कार्य करीत असतात. पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ते प्राध्यापक असून उत्कृष्ट हँडबॉल प्लेअर, उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. थोरात यांनी देहदानही केले असून समाजाप्रती आपले असलेले कर्तव्य मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून आजच्या तरुणांनी देखील अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही ते करत असतात.

comments

About Rajtantra

Scroll To Top