दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा तालुक्यात कडकडीत बंद; कुडूसमध्ये भिमसैनिकांचा रास्ता रोको

वाडा तालुक्यात कडकडीत बंद; कुडूसमध्ये भिमसैनिकांचा रास्ता रोको

BHIMA KOREGAON-wadaप्रतिनिधी
वाडा, दि. 3 : भिमा कोरेगाव येथे दोन गटातील वादाला हिंसक वळण लागल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यामुळे पालघर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातही उस्फूर्त बंद पाळण्यात येवून या घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला. तालुक्यातील कुडूस येथील आंबेडकरांच्या अनुयायांनीही कुडूस येथे बंद पाळून रास्ता रोको आंदोलन केले.
वाडा व कुडूस बंदमध्ये येथील व्यापार्‍यांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवल्याने येथील सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. स्थानिक भाजीपाला, फळविक्रेते यांचीही दुकाने आज बंद होती तर अत्यावश्यक सेवा व शाळा या बंदमधून वगळण्यात आल्याने त्या सुरळीत सुरू होत्या. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कुडूस येथील पोलीस स्टेशनसमोर आयोजित केलेल्या निषेध आंदोलनातुन कोरेगाव येथील घटनेला जबाबदार असणार्‍यांना अटक करावी. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच वाडा शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणा देत वाडा बस स्थानक व खंडेश्वरी नाका येथे निदर्शने करण्यात आली.
रॅलीनंतर आंदोलनातील महिला कार्यकर्त्यांमार्फत वाडा उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधासंदर्भात निवेदन देण्यात आले. वाडा येथील आंदोलनात नगरसेवक राम जाधव, सचिन मुकणे, किरण थोरात, भरत गायकवाड, मंदाताई कांबळे, नंदा बोरकर, सचिन गायकवाड, प्रकाश थोरात तर कुडूस येथील आंदोलनात रामदास जाधव, स्वप्नील जाधव, रमेश भोईर, रश्मी भोईर, डी. जी. भोईर, नितीन जाधव, सचिन जाधव, मुस्तफा मेमन, आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top