दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद पालघर स्थानकात रेल्वे रोखून केली निदर्शने

पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद पालघर स्थानकात रेल्वे रोखून केली निदर्शने

cropped-LOGO-4-Online.jpgप्रतिनिधी
पालघर, दि. 3 : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर अभिवादनाकरिता आंबेडकरी अनुयायी गेले असता निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अन्याय झाल्याच्या भावनेतून भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पालघर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील आंबेडकरी विचारधारेच्या सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत पुकारलेल्या या बंदला येथील व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळून या घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. पालघरसह जिल्ह्यातील डहाणूचा अपवाद वगळता बोईसर, सफाळे, वाडा, कुडूस, मोखाडा, खोडाळा, वसई, विरार आदी भागात बंद पाळण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढ्याला 1 जानेवारी रोजी दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवशी इंग्रजांनी पेशव्यांबरोबरची लढाई जिंकली होती. लढाई जिंकल्यानंतर इंग्रजांनी तेथे विजयस्तंभ उभारलेला आहे. या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात आंबेडकरी समाज सामील झाला होता. त्यामुळेच या लढाईत मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी तेथील विजयस्तंभावर अभिवादनासाठी गेले होते. त्यावेळी निर्माण झालेल्या जातीय तणावातून दंगल उसळली. या दंगलीत असंख्य वाहनांची तोडफोड झाली. अनेक बसेस जाळल्या गेल्या असून या दोन जणांना प्राण गमावावे लागले आहेत. हा नियोजनपूर्वक हल्ल्याचा कट असल्याचा आरोप करीत समाजकंटकांवर कारवाई व्हावी याकरिता व त्या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत पालघरसह बोईसर, सफाळे येथील बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या. रस्त्यावर धावणारी खाजगी प्रवासी वाहतूकही बंद होती. त्यामुळे प्रवाशांचेही काही प्रमाणात हाल झाले. मात्र राज्य परिवहन मंडळाची बसवाहतूक सुरळीतपणे सुरु राहिल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
दरम्यान हजारो कार्यकर्त्यांनी पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रोखून धरत जोरदार निदर्शने केल्याने काही काळ रेल्वे वाहतूकही खोळंबली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी आरपीआयचे

comments

About Rajtantra

Scroll To Top