दिनांक 21 January 2018 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूसमध्ये बंदला प्रतिसाद

कुडूसमध्ये बंदला प्रतिसाद

BHIMA KOREGAON-Kudusप्रतिनिधी :
कुडूस, दि. 03 : भिमा कोरेगाव येथे दोन गटातील वादाला हिंसक वळण लागल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातून उस्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुडूसमध्ये देखील बंद पाळण्यात आला.
कुडूस बंदमध्ये स्थानिक व्यापारी संघटना सामील झाल्याने येथील सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता. स्थानिक भाजीपाला, फळविक्रेते यांचेही धंदेही आज बंद होते. अत्यावश्यक सेवा व शाळा सुरू राहिल्या. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कुडूस येथील पोलीस स्टेशन समोर आयोजित केलेल्या निदर्शनात आंदोलकांनी कोरेगाव येथील घटनेला जबाबदार असणार्‍यांना अटक करावी, त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी केली. या आंदोलनातुन रामदास जाधव, स्वप्नील जाधव, रमेश भोईर, रश्मी भोईर, डी. जी. भोईर, नितीन जाधव, सचिन जाधव यांनी उद्भोदन केले. तर मुस्तफा मेमन, भगवान चौधरी आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top