दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » अनोपचंद कर्णावट कालवश

अनोपचंद कर्णावट कालवश

ANOPCHAND KARNAVATडहाणू दि. 01 : येथील समाजसेवक अनोपचंद नेमीचंद कर्णावट यांचे काल, रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी रुपवंती, माजी नगरसेवक रमेश, सुभाष, दिनेश व सतीष ही भावंडे असा परिवार आहे. रविवारी सायंकाळीच त्यांच्या पार्थिवावर डहाणू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
अनोपचंद यांचे समाजकार्य लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जैन समाजात त्यांना मोठे आदराचे स्थान होते. काल, बोईसर येथील उपाश्रयाला 40 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बोईसर येथील उपाश्रय स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी आतापर्यंत 5 उपाश्रय सुरु केले असून या उपाश्रयांच्या संचालनाची त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जबाबदारी पार पडली.

comments

About Rajtantra

Scroll To Top