दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार येथे तालुकास्तरीय अधिकारी व कमर्चारी क्रीडास्पर्धा संपन्न!

जव्हार येथे तालुकास्तरीय अधिकारी व कमर्चारी क्रीडास्पर्धा संपन्न!

JAVHAR KRIDA SPARDHAप्रतिनिधी
जव्हार, दि. 01 : तालुक्यातील राजीव गांधी स्टेडियम येथे 28 ते 29 डिसेंबर अशा दिवसांच्या कालावधीत तालुकास्तरीय अधिकारी-कमर्चारी क्रीडास्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वयक्तिक व सांघिक अशा 14 स्पर्धा महिला व पुरुष गटात घेण्यात आल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जव्हार पंचायत समितीच्या सभापती अर्चना कमलाकर भोरे, उपसभापती सीताराम पागी, सदस्य अनुराधा डोके, जिल्हा परिषद सदस्य अशोक भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड, जव्हारचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी अतुल पारसकर, गटशिक्षणाधिकारी भारत कासले तसेच ग्रामसेवक, शिक्षक, केंद्रप्रमुख, कर्मचारी संघटना व विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, रस्सीखेच या सांघिक तर धावणे, संगीत खुर्ची, लांबउडी, बुद्धिबळ, गोळाफेक, भालाफेक, लिंबू चमचा अशा वयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व अधिकारी, खातेप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, ग्रामसेवक, केंद्रप्रमुख व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. तर गटविकास अधिकारी म्हात्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी पारसकर, आर. के. गरेल, आर.के. गायकवाड, दांडेकर, डी. ए. महाले, वासंती, संतोष रजपूत, रावळ, बी. एम. कासले, पी.बी. हरड यांनी नियोजनाची धुरा संभाळली.

comments

About Rajtantra

Scroll To Top