दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : नदीजोड प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांचा धडक मोर्चा

जव्हार : नदीजोड प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांचा धडक मोर्चा

मनोज काJAWHAR NADIJOD PRAKALP1मडी
जव्हार, दि. 01 : तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगरहवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील भूगद डोहवर व कारगिल हिल टेकडीजवळ केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पाचे काम चालू करण्यास शासनाच्या हालचालींना वेग आला आहे. या दमणगंगा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी आज, सोमवारी जव्हार अप्पर जिल्हाअधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
या प्रकल्पामुळे 52 गावे विस्थापित होणार असून सुमारे 1 लाख आदिवासी कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकर्‍यांनी हा धडक मोर्चा काढला. गोरवाडी नाक्यावरुन सुरु झालेला हा मोर्चा यशवंतनगर, पाचबत्ती नाका, गांधीचौक, मांगेलवाडा येथून मार्गक्रमण करुन जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. प्रकल्पाला विरोध दर्शवतानाच मंजूर झालेल्या वनपट्टेधारकांना त्वरीत 7/12 चा उतारा द्यावा, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, पेसा कायद्यानुसार नोकर भर्ती करावी, तालुक्यातील गाव-पाड्यांतील रखडलेले रस्ते पूर्ण करावेत, तसेच जव्हार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कुटुंबांना घरकुल व शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, आश्रम शाळा आणि जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करू नये, अशा अन्य मागण्या देखील या मोर्चातून करण्यात आल्या. यावेळी जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर दुबे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांसह मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यानंतर अधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या मोर्चात माकपचे लक्ष्मण जाधव, जिल्हा सेक्रेटरी कॉ. बारक्या मांगात, तालुका सेक्रेटरी कॉ. यशवंत बुधर, कॉ. शिवराम बुधर, कॉ. विजय शिंदे, कॉ. शांतीबाई खुरकुटे तसेच पंचायत समिती सदस्य यशवंत घाटाळ यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top