दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » नव वर्षाच्या पूर्वसंध्येला जागर दुर्ग स्वच्छतेचा! सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने पार पडली केळवे भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला जागर दुर्ग स्वच्छतेचा! सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने पार पडली केळवे भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम

SAHYADRI SWACHTA MOHIMदि. 01 : नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे तरुणाईचा जल्लोश आणि मौजमजा करणे असे समिकरणच ठरले आहे. यापेक्षा वेगळी वाट चोखाळून सह्याद्री मित्र परिवाराने केळवे येथील सुरुच्या बागेत असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचा आणि दुर्गांवर स्वच्छता राहावी यासाठी जागरहाटी म्हणून 31 डिसेंबर 2017 म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्वच्छता मोहीम राबविली.
परिसरातील गडकोटांवर जाऊन पार्ट्या करण्याचा चुकीचा पायंडा अलिकडे पडत चालला असून विविध गडांवर नकळत हौशी पर्यटक केरकचरा करीत असतात. या गोष्टीला पायबंद घातला जावा म्हणून सह्याद्री मित्र परिवार मागील काही वर्षांपासून नव वर्षाचे औचित्य साधून गडस्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अभियान राबवित आहे. यावर्षी केळव्यात पर्यटकांचा प्रचंड ओघ पाहता ही मोहीम भुईकोट किल्ल्यावर राबविण्यात आली. यावेळी माकुणसार, केळवे, मथाणे, सफाळे आणि बोईसर आदी परिसरातील तरुणांनी त्यास प्रतिसाद देत केळवे बिचवर आणि किल्ल्यावर आलेल्या तमाम पर्यटकांना दुर्गसंवर्धन जाणिवेचा अनोखा संदेश दिला.

comments

About Rajtantra

Scroll To Top