दिनांक 21 January 2018 वेळ 4:28 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव समारंभ थाटात संपन्न

वाडा : तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव समारंभ थाटात संपन्न

WADA SHIKSHAK GUNGAURAV SAMARAMBH1प्रतिनिधी :
कुडूस, दि. 01 : वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडीयल एज्युकेशन कॅम्पसच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय
शिक्षक गुणगौरव समारंभ थाटात संपन्न झाला. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते व जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती निलेश गंधे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तर वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी पालकमंत्री सवरांसह शेळके व गंधे यांची शिक्षकांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. सवरा मार्गदर्शन करताना म्हणाले, सुसंस्कारित विद्यार्थी व देशासाठी सच्चा इन्सान घडविण्याचे महान कार्य शिक्षक करतात. मी मंत्री झालो तो माझ्यावर सुसंस्कार घडविणार्‍या शिक्षकामुळेच. भारत महासत्ता बनविण्यासाठी शिक्षकाचे काम महत्वाचे आहे. राज्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी राज्यात नामांकित शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांत 50 हजार आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी बांधवानांही आता शिक्षणाचे महत्व समजले आहे असे सांगतानाच स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे हे लक्षात घेवून शिक्षकांनी अध्यापन करावे, असे आवाहन सवरा यांनी यावेळी केले.
प्रारंभी गटशिक्षणाधिकारी कृष्णा जाधव प्रास्ताविक करताना म्हणाले की, वाडा तालुक्यात 355 शाळा आहेत. यात 42 हजार 139 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 297 जिल्हा परिषद शाळांपैकी 227 शाळा शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत व 170 शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा येत्या काही महिन्यांत लर्निंग स्पेस व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने डिजिटल होतील, अशी माहिती जाधव यांनी दिली.
शिक्षक गौरव कार्यक्रमातुन सवरा यांच्या हस्ते सदानंद मढवी, लक्ष्मण पाटील, शरद पराड, विलास मुकणे, निलम पाटील, नेहा पाटील, चंद्रकांत भोईर, चंद्रकांत घरत, प्रियांका मोरे, संतोष जाधव यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पुरस्कार प्राप्त किसन जाधव व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका वैष्णवी गव्हाळे यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ पाटील, सदस्य मेघना पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच शिक्षक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश पाटील व अर्चना चौधरी यांनी केले. आभार गोविंद पाटील यांनी मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top