दिनांक 21 October 2018 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

डहाणू, दि. 30 : आदिवासी प्रगPARULEKAR MAHAVIDYALAYती मंडळ संचलित कॉ. श्यामराव परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे अध्यक्ष ल. शि. कोम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक समितीचे सचिव कॉ. एल. बी. धनगर, संस्थेचे सचिव कॉ. बी. व्ही. मांगात, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, तलासरीच्या परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, आशागड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितिन वेडगा, मुख्याध्यापिका सौ. शितल भालेराव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्षभरात विविध कला/क्रिडा स्पर्धा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता दाखविणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देखील कार्यक्रमाचा आनंद लुटला.

comments

About Rajtantra

Scroll To Top