दिनांक 21 January 2018 वेळ 4:23 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : डेंगाचीमेट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा साकुर तर माध्यमिक गटात के. व्ही. हायस्कूल प्रथम

जव्हार : डेंगाचीमेट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा साकुर तर माध्यमिक गटात के. व्ही. हायस्कूल प्रथम

प्रतिVIDYAN PRADARSHANनिधी
जव्हार, दि. 29 : डेंगाचीमेट येथील जयेश्वर विद्यामंदिर या निसर्गरम्य शाळेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. तालुक्यातील
प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून एकूण 40 प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जव्हार पंचायत समिती सभापती अर्चना भोरे, पालघर जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य अशोक भोये, नियोजन समिती सदस्य हरीश्चंद्र भोये, माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ज्योतीताई भोये, अनुराधा डोके, गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे, गटशिक्षण अधिकारी भरत कासले, शाळेचे मुख्याध्यापक नरेश मराड व इतर मान्यवर उपस्थित होते. तर बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी जव्हार पंचायत समिती उपसभापती सीताराम पागी, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चांगले आरोग्य, कचर्‍याची समस्या, जलाशयाचे संवर्धन, अन्न सुरक्षा, वाहतूक आणि दळणवळण, गणितीय प्रतिकृती या विषयावर आधारित विविध प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमधून प्राथमिक गटातून जिल्हा परिषद शाळा साकुरच्या कॅशलेस टोलनाका (वाहतूक आणि दळणवळण) या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हा परिषद शाळा डोंगरपाडा व जिल्हा परिषद शाळा पाथर्डी या शाळेने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर जिल्हा परिषद शाळा काशिवली नं. 2 या शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पाला उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविण्यात आले. तसेच माध्यमिक गटात के. व्ही. हायस्कूल जव्हारने प्रथम, श्रीजयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट या शाळेने द्वितीय व भारती विद्यापीठ प्रशालाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीसासाठी न्याहाळे हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड झाली.
दरम्यान, गेल्यावर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा साकुर या शाळेचे शिक्षक व मार्गदर्शक सुनील बोरसे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थिती मान्यवरांनी विद्यार्थाांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top