दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मिनी अंगणवाडी सेविकांचे शैक्षणिक प्रदर्शन संपन्न

मिनी अंगणवाडी सेविकांचे शैक्षणिक प्रदर्शन संपन्न

KOSBAD NEWSकोसबाड, दि. 29 : विकासवाडी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मिनी अंगणवाडी सेविका प्रशिक्षणार्थींनी बनविलेल्या हस्तव्यवसाय आणि शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन संपन्न झाले. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर, सचिव दिनेश पाटील, सुधीर कामत उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींनी बालकांना स्पर्शज्ञान, फुले, पाने, फळे यांच्या विषयीची माहिती देणारे विविध आकर्षित साहित्य तयार केले होते. उपस्थितांनी प्रदर्शनाला भेट देऊन साहित्याची ओळख करुन घेतली व प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top