दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

K. V. Highschool1प्रतिनीधी
जव्हार, दि. 29 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण व विविध कला गुणदर्शन समारंभाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. काल, गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी भूषविले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची स्तुती करत सर्वांचे अभिनंदन करून कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जव्हार नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य राजाराम मुकणे, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, सूर्यनगर हायस्कूल वाघाडीचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाट व पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य के. एस. महाले यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. विद्यालयाच्या जीतमंचाने शब्दसुमनांनी सर्व मान्यवराचे यथोचित स्वागत केले. तर विद्यार्थी संचालकाने मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी मानवी मनोरे, लेझीम, कवायत, साहित्य कवायत आदींची प्रत्यक्षिके डोळ्याची पारणे फेडणारी होती. तसेच इ. 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी विविध कला गुण प्रदर्शन व आदिवासी नुत्य करून मान्यवरांचे मन जिंकले. तर उपस्थितांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना योग्य प्रतिसाद दिला.
याप्रसंगी विविध कला-क्रीडास्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व विजयचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बी. बी. आणेराव यांनी केले. तर निवेदन पि. डी. बोडके व व्ही. एस. खंडागळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक के. बी. पवार, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top