दिनांक 21 October 2018 वेळ 12:22 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन

दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpgपालघर, दि. 29 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. 6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधिश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या बिजभाषणाने सदर परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. सदर परिसंवादाच्या निमित्ताने विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी न्यायमूर्ती अभय ओक यांच्याशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड्. व्ही. ए. गांगल उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी हे भूषविणार आहेत.
या परिसंवादास पालघर येथील न्यायालयातील ज्येष्ठ वकिल, वेगवेगळया शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top