दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बलात्कारीतांना 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा पालघर सत्र न्यायालयाने दिला निकाल

बलात्कारीतांना 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा पालघर सत्र न्यायालयाने दिला निकाल

cropped-LOGO-4-Online.jpgशिरीष कोकीळ
पालघर, दि. 28 : 2 वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार करणार्‍या नराधमांना पालघर येथील सत्र न्यायालयानचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश उर्फ गोट्या अशोक भुरकूड आणि विलास उर्फ काकड्या रामा भुरकूड अशी आरोपींची नावे असून निकाल सुनावताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली आहे.
या प्रकरणातील पिडीत महिला 17 ऑगस्ट 2015 रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास आपल्या मुलाला शोधण्यासाठी बहीणीकडे गेली होती. तिथून घरी परतताना मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चरी येथील ओहोळाजवळ आरोपींनी फिर्यादीला मागून पकडून खाली पाडले व तोंडात रुमाल कोंबून सामुहिक बलात्कार केला आणि याबाबत कुठेही वाच्यता केल्यास पाण्यात बूडवून ठार मारण्याची धमकी दिली.
मनोर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. एकूण 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. आज उभय बाजुंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 376 प्रमाणे 7 वर्षे व कलम 506 प्रमाणे 1 वर्ष कालावधीची सक्तमजुरी कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महीने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. आर. तरे यांनी प्रभावी बाजू मांडली.

comments

About Rajtantra

Scroll To Top