दिनांक 21 January 2018 वेळ 4:30 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : भारती विद्यापीठाच्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात

जव्हार : भारती विद्यापीठाच्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात

JAWHAR BHARTI VIDYAPITHप्रतिनिधी
जव्हार, दि. 28 : शहरातील भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हारच्या सन 2017-18 या वर्षीच्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात झाली असुन या महोत्सवात होणार्‍या विविध स्पर्धांमध्ये एकूण 300 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज, गुरुवारी मुख्याध्यापक के. पी. तरवारे यांच्या करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, रिले आदी सांघिक खेळ खेळविले जाणार आहेत. तसेच गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी आणि 100 मी., 200 मी., 400 मी., 800 मीटर धावणे हे वयक्तीक खेळ खेळविले जाणार आहेत. या क्रीडा महोत्सवात इयत्ता 5 वी ते 7 वीपर्यंत पहिला गट, 8 वी ते 10 वीपर्यंत दुसरा गट, आणि 11 वी ते 12 वीपर्यंत तिसरा गट, अशा तीन गटातून एकूण 18 संघांनी कबड्डी आणि खो-खो खेळात सहभाग घेतला आहे. या स्पर्धांना आजपासुन सुरवात झाली असून, खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर यास प्रतिसाद दिला आहे. हा शालेय क्रीडा महोत्सव 28 व 29 डिसेंबर असा दोन दिवस चालणार आहे.
स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तुळशीराम चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारती विद्यापीठ प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. जरग, इंग्रजी माध्यमिक प्रभारी मुख्याध्यापक विजय बल्लाळ, भारती विद्यापीठ आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. घार्गे तसेच खेळांचे पंच, शाळेचे शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top