दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार सर्व पदाधिकार्‍यांची उपस्थिती

जव्हार नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार सर्व पदाधिकार्‍यांची उपस्थिती

प्रतिनिधीJAWHAR NAGRADHYAKSH
जव्हार, दि. 28 : अतिशय अटीतटीच्या झालेल्या जव्हार नगरपरिषद निवडणूकीमध्ये शिवसेनेने बाजी मारत आपला नगराध्यक्ष निवडणून आणला होता. यानंतर नगराध्यक्ष चंद्रकांत (भिकू) पटेल यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर जावून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज, गुरुवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पटेल यांनी पदभार स्विकारला.
जव्हार नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्राप्त करीत सेनेने पहिल्यांदाच झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही आपलेच वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणूकांच्या निकालांनतर आनंदोत्सव साजरा केल्यानंतर सर्व मतदारांचे आभार मानत व मातोश्रीवरुन आशीर्वाद घेऊन आज सेना नगराध्यक्षांनी कारभार हाती घेतला. त्यानुसार आजपासूनच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पटेल हे कामकाज पाहणार असून मी जनतेचा नगराध्यक्ष असून नगराचा विकास, मूलभूत गरजांची पुर्तता आणि भ्रष्टाचार विरहीत विकास कामे करणे हाच माझा मुख्य उद्देश असल्याचे सांगत जव्हारकरांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जावु देणार नाही, अशी ग्वाही पटेल यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिनेश भट, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, अमोल पाटील, मुख्याधिकारी वैभव विधाते, परेश पटेल, अर्शद कोतवाल, विठ्ठल सदगीर आदि पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top